निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीचे नुकसान केल्याचा ठपका; पोलिसांत गुन्हा नोंद
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील कुवारबाव बाजारपेठ परिसरात निष्काळजीपणे दुचाकी चालवून रस्त्यातील खड्ड्यात पडल्यामुळे ६२ वर्षीय वृद्ध जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले असून स्वतःच्याच अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात संबंधित वृद्ध स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुवारबाव बाजारपेठ परिसरातील घटना; पोलिसांकडून गुन्हा नोंद
संतोष रामचंद्र पावसकर (वय ६२, रा. साईनगर, कुवारबाव अष्टविनायक सोसायटी, रत्नागिरी) असे जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना १० जुलै रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित वृद्ध संतोष पावसकर हे आपली दुचाकी (क्रमांक MH 08 AJ 4405) घेऊन रत्नागिरी ते हातखंबा महामार्गावरून जात होते. कुवारबाव बाजारपेठ येथे आले असता त्यांची दुचाकी रस्त्यावरील खड्ड्यात जाऊन आदळली व ती खाली पडली.
पोलिसांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
या अपघातात संतोष पावसकर हे स्वतः जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र खापरे यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांच्या तक्रारीवरून संशयित वृद्धाविरुद्ध रविवारी (१६ ऑगस्ट) शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 18-08-2026














