कर्तव्यनिष्ठा आणि प्रभावी कामगिरीची दखल; राजापूर नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
राजापूर: भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या मानाच्या पदकांमध्ये राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे. केंद्रीय गृह मंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयाकडून या सन्मानाची घोषणा करण्यात आली आहे.
शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि प्रभावी कारवाईची दखल
पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती, गुन्हेगारीविरोधात त्यांनी केलेल्या प्रभावी कारवाया तसेच नागरिकांशी ठेवलेला संवेदनशील व माणुसकीचा संवाद यामुळे त्यांच्या उत्कृष्ट कार्याची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली आहे. त्यांना पदक जाहीर झाल्याने राजापूर पोलीस ठाण्याचे नाव उंचावले असून सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
लोकप्रतिनिधींकडून सत्कार आणि शुभेच्छांचा वर्षाव
उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल राजापूर नगर परिषदेचे गटनेते ॲड. जमीर खलिफे आणि आरोग्य समिती सभापती सुलतान ठाकूर यांनी राजापूर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक अमित यादव यांची भेट घेतली. यावेळी त्यांना शाल व पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गनी खोपेकर, फैसल पठाण यांच्यासह अन्य मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 18-08-2026














