श्रावणातील पहिल्या मंगळवारी घडतोय दुर्मीळ ग्रहयोग; जाणून घ्या तुमच्या राशीवर काय होणार परिणाम
मुंबई: वैदिक पंचांगानुसार, आज १८ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावण महिन्यातील पहिला मंगळवार आहे. श्रीगणेशाच्या उपासनेसाठी आणि आराधनेसाठी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, आज ग्रहांच्या हालचालींमुळे एक अत्यंत दुर्लभ आणि शुभ संयोग जुळून येत आहे. या ग्रहस्थितीचा प्रभाव सर्व १२ राशींवर पाहायला मिळणार असून, बाप्पाच्या कृपेने काही राशींना मोठे लाभ मिळतील, तर काहींना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
१. मेष रास (Aries)
वैवाहिक जीवनात वैचारिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. एकमेकांमधील गैरसमज दूर करताना मोठी कसरत करावी लागेल. संयम राखून संवाद साधणे फायदेशीर ठरेल.
२. वृषभ रास (Taurus)
आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत अत्यंत काळजीपूर्वक पावले उचला. नातेवाईकांकडून किंवा ओळखीच्या लोकांकडून आर्थिक फसवणूक होणार नाही ना, याकडे विशेष लक्ष द्या.
३. मिथुन रास (Gemini)
चारचौघात चर्चा किंवा गप्पा सुरू असताना शांतपणे श्रोत्याची भूमिका घेणे फायदेशीर ठरेल. कामाच्या निमित्ताने किंवा कौटुंबिक कारणास्तव प्रवासाचे योग संभवतात.
४. कर्क रास (Cancer)
आज तुम्ही संवेदनशील राहाल. इतरांच्या मनात शिरून त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. परदेशी जाण्यासंबंधी मार्गात असलेले अडथळे दूर होऊन अडकलेली कामे मार्गी लागतील.
५. सिंह रास (Leo)
धनलाभाच्या दृष्टीने तोंडाशी आलेले यश किंवा मिळणारे पैसे काहीसे रेंगाळण्याची शक्यता आहे. आर्थिक कामात यश मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतील.
६. कन्या रास (Virgo)
या राशीच्या महिला आज आपल्या क्षेत्रात विशेष धडाडी दाखवतील. आपल्या कामाशी काम ठेवण्याच्या स्वभावामुळे तुम्ही सहजासहजी कोणावरही आंधळा विश्वास ठेवणार नाही.
७. तूळ रास (Libra)
तरुणांना प्रेम प्रकरणात अपेक्षित यश मिळेल. आपल्या आवडत्या व्यक्तीकडून किंवा जोडीदाराकडून मनासारखा प्रतिसाद मिळाल्यामुळे तुमचा दिवस अत्यंत आनंदी जाईल.
८. वृश्चिक रास (Scorpio)
प्रत्येक गोष्ट केवळ भावनांच्या निकषावर तोलणे योग्य ठरणार नाही. काही व्यावहारिक आणि कटू निर्णयांच्या बाबतीत वास्तववादी दृष्टिकोन ठेवावा लागेल.
९. धनु रास (Sagittarius)
आज तुमचे मन थोडे अस्थिर आणि चंचल राहण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी स्वतःच्या मनावर व भावनांवर ताबा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
१०. मकर रास (Capricorn)
किरकोळ किंवा क्षुल्लक कारणांवरून भावनांचा उद्रेक होऊ देऊ नका. रागाच्या भरात चुकीचे शब्द वापरल्यास जवळच्या लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे.
११. कुंभ रास (Aquarius)
आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, प्रकृती स्वास्थ्य वरचेवर बिघडू शकते. कौटुंबिक नात्यांमध्ये किंवा महिला सदस्यांमध्ये लहान-सहान कारणांवरून खटके उडण्याची शक्यता आहे.
१२. मीन रास (Pisces)
घरातील मुलांशी किंवा धाकट्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. याशिवाय नवीन जागा, घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्यासंबंधीच्या व्यवहारात काही अडचणी उद्भवू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी रत्नागिरी खबरदार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून रत्नागिरी खबरदार कोणताही दावा करत नाही.)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
18/08/2026, 11:18 am














