Nakhare School Deep Puja: नाखरे जि. प. शाळेत ‘दीपपूजा’ विशेष उपक्रम उत्साहात साजरा

आषाढ अमावस्येनिमित्त विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

पावस:

Nakhare School Deep Puja (नाखरे शाळा दीपपूजा उपक्रम): रत्नागिरी तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या नाखरे, कालकरकोंड जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेत आषाढ अमावस्येचे औचित्य साधून ‘दीपपूजा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच महिला पालकांनी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

भारतीय संस्कृतीत दिव्यांना विशेष महत्त्व असून तमसो मा ज्योतिर्गमय असा संदेश देणाऱ्या दीपपूजनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना बालवयातच समजावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी आणलेल्या विविध प्रकारच्या दिव्यांची आरास मांडून पूजन करण्यात आले.

या विशेष उपक्रमाचे नेटके आयोजन शाळेतील शिक्षक वैदेही जोशी, उमेश लिंगायत आणि अनंत कदम यांनी केले. दुर्गम भागातील शाळेत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील ग्रामस्थ आणि शिक्षण वर्तुळातून कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 19-08-2026