Ganpatipule Temple Shravani Ritual: गणपतीपुळे मंदिरात ऋग्वेदी उत्सर्जन आणि उपाकर्म विधी उत्साहात संपन्न

ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषाने तीर्थक्षेत्र परिसर दुमदुमला; श्रींच्या मुख्य मंदिर सभागृहात धार्मिक अनुष्ठान पार

गणपतीपुळे:

Ganpatipule Temple Shravani Ritual (गणपतीपुळे ऋग्वेदी उत्सर्जन विधी): रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील श्री स्वयंभू गणपती मंदिरात रविवारी ऋग्वेदी उत्सर्जन आणि उपाकर्म (श्रावणी) विधी अतिशय भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. “श्रीं”च्या मुख्य मंदिराच्या सभागृहात समस्त गणपतीपुळे ब्रह्मवृंदाच्या वतीने सकाळी ८ ते ११ या वेळेत हे धार्मिक अनुष्ठान संपन्न झाले.

शास्त्रोक्त पद्धतीने ऋग्वेदी उपाकर्म विधी

सनातन हिंदू धर्मशास्त्रातील विधीनुसार ऋग्वेदी शाखेचा श्रावणी प्रयोग विधी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने आणि प्रसन्न वातावरणात पूर्ण करण्यात आला.

या प्रसंगी उपस्थित ब्रह्मवृंदांनी केलेल्या उच्चारबद्ध वेदघोषाने मंदिराचा संपूर्ण परिसर पवित्र आणि भक्तिमय झाला होता. वर्षभरात झालेल्या नित्यकर्मातील त्रुटींच्या प्रायश्चित्तासाठी आणि नवीन वर्षात वेदाध्ययनाच्या संकल्पासाठी हा श्रावणी विधी केला जातो.

स्थानिक ब्रह्मवृंदाचा उत्स्फूर्त सहभाग

गणपतीपुळे येथील सर्व प्रमुख पुरोहित आणि ब्रह्मवृंद या धार्मिक सोहळ्याला उत्साहाने उपस्थित होते. श्रावणी विधीच्या माध्यमातून पारंपरिक धार्मिक प्रथा आणि वेद परंपरेचे जतन करण्याचे काम या माध्यमातून सातत्याने केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 19-08-2026