Gogate Joglekar College Wild Vegetable Competition: गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘रानभाजी पाककृती स्पर्धा’ उत्साहात

अळूची वडी, सुरणाचे कटलेट ते टाकळ्याचे थालीपीठ; रानभाज्यांच्या कल्पक पदार्थांची आकर्षक मांडणी

रत्नागिरी:

Gogate Joglekar College Wild Vegetable Competition (गोगटे जोगळेकर महाविद्यालय रानभाजी पाककृती स्पर्धा): येथील प्रतिष्ठित गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग आणि अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या जीवशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष ‘रानभाजी पाककृती स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र प्रयोगशाळेत पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल ३३ विद्यार्थ्यांनी हिरिरीने आणि उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

रानभाज्यांचे पोषणमूल्य अन् आहारातील वापर वाढवणे उद्देश

रानभाज्यांचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म तसेच पर्यावरणीय महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे आणि स्थानिक हंगामी रानभाज्यांचा रोजच्या आहारातील वापर वाढावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचा कल्पकतेने वापर करून विविध चविष्ट व पौष्टिक पदार्थ तयार केले. यामध्ये अळूची वडी, भारंगीची भाजी, रानभाजीचे थालीपीठ, सुरणाचे कटलेट, रानभाजीचे कबाब, काटल्याची भाजी, अंबाडीचे cutlet, टोरा व्हेजिटेबल करी, टाकळा-मका भाजी, टोरा टोफू पराठा आणि कुड्याच्या शेंगांची भाजी अशा नाविन्यपूर्ण पदार्थांची आकर्षक मांडणी विद्यार्थ्यांनी केली होती.

Gogate Joglekar College Wild Vegetable Competition: प्रमुख उपस्थितांच्या हस्ते उद्घाटन

स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. डी. आर. वालावलकर, जीवशास्त्र विभागप्रमुख श्री. शिंगाडे आणि चारुदत्त पड्यार उपस्थित होते. डॉ. सोनाली कदम यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली.

स्पर्धेचे परीक्षण जी.जी.पी.एस. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाटणकर आणि जांभेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजना तारी यांनी केले. रानभाजीचा वापर, चव, पौष्टिक मूल्य, सर्जनशीलता, सादरीकरण, रानभाजीचे ज्ञान आणि स्वच्छता या निकषांवर पदार्थांचे गुणदान करण्यात आले.

स्पर्धेचे विजेते

विविध निकषांवर आधारित दिलेल्या गुणांनुसार खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले:

  1. प्रथम क्रमांक: स्वरूपा मंदार आठवले (पदार्थ: टाकळ्याचे थालीपीठ)
  2. द्वितीय क्रमांक: संबोधी जितेंद्र कांबळे (पदार्थ: टाकळ्याचे पराठे)
  3. तृतीय क्रमांक: वेदा विजय पाडावे (पदार्थ: अंबाडी कटलेट)
  4. उत्तेजनार्थ / इतर विजेते: कस्तुरी मिथिलेश कीर (सुरणाचे कटलेट), ऋतुराज जयंत विरकर, श्रिया विवेक गावडे

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. शरद आपटे, डॉ. विराज चाबके, प्रा. प्रियांका शिंदे-अवेरे यांनी विशेष मेहनत घेतली, तर समन्वयाचे काम श्री. पोकळे आणि श्रीमती दातार यांनी सांभाळले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 19-08-2026