रत्नागिरी : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात आता हलक्या थंडीची चाहुल सुरू झाली आहे. पहाटे पडणारे धुके आणि आद्रतेच्या प्रमाणात झालेली वाढ यामुळे सकाळच्या सत्रात चांगला गारठा पडू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात थंडीच्या चाहुलीने बागायतदारांनीही बदललेल्या वातावरणाचा अंदाज घेऊन आंबा काजूच्या बेगमीच्या वेळापत्रकाची जुळवाजुळव सुरू केली आहे.
किनारी भगातील हवेचा दाब गुरुवारी 1012 हेप्टापास्कल इतका राहणार आहे. त्यामुळे सकाळी सौम्य थंडी व दुपारी उष्ण हवामान राहणार आहे. बहुतांशी भागांमध्ये कमाल तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसने, तर किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी या किनारी जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत हवामान अल्प प्रमाणात अंशतः ढगाळ राहील. वार्याची दिशा आग्नेय व वायव्येकडून राहील. वार्याचा ताशी वेग साधारणच राहील. त्यामुळे पुढील आठवड्यात बाष्पीभवनाच्या वेगात वाढ होईल.
त्यामुळे पिकांची, जनावरांची तसेच कुक्कुट पक्ष्यांची पाण्याची गरज वाढेल. त्या अनुषंगाने योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या कालावधीत कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांत 34 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता 35 ते 43 टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता 12 ते 17 टक्के इतकी कमी राहील. त्याचा आंबा पिकाच्या फलधारणेवर परिणाम होईल. सर्वच जिल्ह्यांत वार्याचा वेग ताशी 6 ते 8 किमी इतका कमी राहील. वार्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील.
गेले अनेक दिवस थंडीच्या प्रतीक्षेत असलेला बागायतदार पहाटे थंडी पडल्याने खूश झाला आहे. मात्र सकाळी थंडी आणि त्यानंतर उकाड्यात झालेली वाढ त्यामुळे आवश्यक थंडी मात्रा अद्याप किनारपट्टी भागात लागू झालेली नाही. सकाळी आठ वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील कमाल तापमान 29 अंश होते. सकाळ दहा वाजता त्यामध्ये 1 अंशाची वाढ झाली. तर दुपारपर्यंत ते 32 अंशावर पोहचले होते. त्यामुळे दुपारची उन्हे मारक ठरत असून अपेक्षित थंडीची प्रतीक्षा बागायती क्षेत्रात अद्याप आहे.
उष्णतेच्या लाटेची शक्यता
उष्ण हवामानाची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्याचा परिणाम सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेवर दिसून येईल. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होऊन हवामान उष्ण व कोरडे राहील. दुपारच्या वेळी उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता राहील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 08-11-2024