Internal SIH 2026 FAMT Ratnagiri: फिनोलेक्स अकॅडमीत ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२६’ चे उत्साहात आयोजन

६५ टीम्स आणि ३८० विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व सहभाग; तांत्रिक कौशल्यांचे प्रदर्शन

रत्नागिरी: Internal SIH 2026 FAMT Ratnagiri अंतर्गत फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (FAMT), रत्नागिरी येथे Internal Smart India Hackathon 2026 चे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (AI & ML), कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (सायबर सेक्युरिटी) आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT) या विभागांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

६५ टीम्स आणि ३८० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

यंदाच्या इंटरनल स्मार्ट इंडिया हॅकाथॉनला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. संस्थेतील तब्बल ६५ टीम्समधील ३८० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. सहभागी विद्यार्थ्यांनी स्मार्ट इंडिया हॅकाथॉन अंतर्गत देण्यात आलेल्या विविध समस्यांवर (Problem Statements) आधारित आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण केले.

सामाजिक व औद्योगिक समस्यांवर तंत्रज्ञानाधारित उपाय

विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान तसेच हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या प्रभावी वापरातून सामाजिक व औद्योगिक आव्हानांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणातून त्यांची सर्जनशीलता, तांत्रिक कौशल्ये आणि नवोपक्रमाची दृष्टी अधोरेखित झाली. राष्ट्रीय स्तरावरील ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन’साठी विद्यार्थ्यांना या स्पर्धेमुळे आवश्यक अनुभव व दिशा मिळाली आहे.

प्रमुख मार्गदर्शक व समन्वयक

या उपक्रमासाठी प्रा. अक्षय शेट्ये यांनी संस्थेचे SPOC (Single Point of Contact) म्हणून जबाबदारी सांभाळली. तसेच श्री. अमर पालवणकर आणि प्रा. अश्विनी काळे यांनी समन्वयक म्हणून मोलाची भूमिका बजावली.

कार्यक्रमाला CSE (AI & ML), IT आणि CSE (Cyber Security) विभागांच्या विभागप्रमुखांचे विशेष मार्गदर्शन लाभले. संस्थेचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद यादव आणि प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 29-08-2026