Nepali Khalashi Distress: नेपाळमधील महाप्रलयानंतर रत्नागिरीतील नेपाळी खलाशांमध्ये चिंता आणि अस्वस्थता

संपर्क तुटल्यामुळे मिरकरवाडा बंदरातील मच्छीमार कामगार चिंतेत


रत्नागिरी :
Nepali Khalashi Distress संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारीचा नवा हंगाम सुरू झाला असून, नेपाळमधून मोठा तरुण वर्ग या व्यवसायात खलाशी म्हणून काम करण्यासाठी दाखल झाला आहे. मात्र, नेपाळमध्ये आलेल्या भीषण महाप्रलयानंतर तेथील नातेवाईक आणि मित्रमंडळींशी फोनवरून संपर्क होत नसल्याने रत्नागिरीतील नेपाळी तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मिरकरवाडा बंदरात कैलाली जिल्ह्यातील तरुणांचा भरणा
रत्नागिरीतील प्रमुख मिरकरवाडा बंदरासह जिल्ह्यातील विविध बंदरांमध्ये मोठ्या संख्येने नेपाळी तरुण नौकांवर खलाशी म्हणून रुजू झाले आहेत. यामध्ये विशेषतः नेपाळमधील कैलाली जिल्ह्यातील तरुणांचा भरणा मोठ्या प्रमाणावर आहे. हा जिल्हा नेपाळमध्ये भारताच्या सीमेला लागून आहे. या जिल्ह्यातील अनेक तरुण जसे भारतात रोजगारासाठी आले आहेत, तसेच नेपाळमधील विविध भागातही कामाच्या शोधात गेले आहेत.

काठमांडूसह प्रलयग्रस्त भागांत नातेवाईक
नेपाळची राजधानी काठमांडूसह महाप्रलयग्रस्त भागांमध्ये या खलाशी वर्गाचे अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळी रोजगाराच्या निमित्ताने कार्यरत आहेत. प्रलयाच्या या कठीण प्रसंगी मोबाईल नेटवर्क विस्कळीत झाल्यामुळे आणि फोनवर संपर्क होत नसल्याने बोटींवर काम करणारा हा खलाशी वर्ग कमालीचा चिंताग्रस्त झाला आहे.

सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून भीतीचे वातावरण
आपले नातेवाईक व मित्रमंडळी सुरक्षित आहेत की नाही, या काळजीने हे सर्व कामगार व्याकुळ झाले आहेत. त्यातच नेपाळमधील भीषण दुर्घटनेचे मोबाईलवर येणारे थरारक व्हिडिओ पाहून त्यांच्यातील अस्वस्थता अधिकच वाढली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 29-08-2026