Ratnagiri: राई-खापरेवाडीत वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद; ५ वर्षांपासूनच्या आजाराला कंटाळून उचलले पाऊल

रत्नागिरी:Ratnagiri Senior Citizen Suicide च्या अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील राई-खापरेवाडी येथील एका वृद्धाने मणक्याच्या तीव्र आजाराला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी आणि क्लेशदायक घटना घडली आहे. वासुदेव भागा खापरे (वय ६७, रा. राई खापरेवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना शनिवारी, २९ ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत वासुदेव खापरे हे गेल्या पाच वर्षांपासून मणक्याच्या तीव्र आजाराने त्रस्त होते. या आजारावर त्यांच्यावर जाकादेवी येथील रुग्णालयात नियमित उपचार सुरू होते. मात्र, सततच्या वेदना आणि आजाराला कंटाळून त्यांनी शनिवारी सकाळी राहत्या घराच्या खोलीतील लाकडी वाशाला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नातेवाईकांनी त्यांना तातडीने शनिवारी सकाळी उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय उपचारादरम्यान दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 31-08-2026