संगमेश्वर आयटीआयमध्ये ‘सोलर टेक्निशियन’साठी भरती

आयएमसीमार्फत कंत्राटी निदेशक पदासाठी अर्ज मागवले; ७ सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्ष अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी:

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), संगमेश्वर येथे पीपीपी तत्त्वाअंतर्गत आयएमसीमार्फत सुरू होणाऱ्या ‘सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)’ व्यवसायासाठी कंत्राटी निदेशक पदाची भरती जाहीर करण्यात आली आहे. हे पद ठोक मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची अट

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे:

विद्युत अभियांत्रिकीमधील किमान द्वितीय श्रेणीची पदवी (Degree) आणि विद्युत क्षेत्रातील १ वर्षाचा अनुभव.

विद्युत अभियांत्रिकी पदविका (Diploma) आणि २ वर्षांचा अनुभव.

सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) व्यवसायातील आयटीआय प्रमाणपत्र परीक्षा, शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) उत्तीर्ण आणि विद्युत क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव.

अर्ज सादर करण्याची पद्धत व मुदत

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर, रामपेठ-सप्तेश्वर रोड, ता. संगमेश्वर’ येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले अर्ज सादर करावेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:05 01-09-2026