ज्योति कदम यांना राज्यस्तरीय ‘आदर्श माता’ पुरस्कार प्रदान

विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुणे येथे सन्मान

राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या मातोश्री ज्योति कदम यांना पुणे येथील जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय ‘आदर्श माता’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. पुणे येथील जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित विशेष सोहळ्यात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याहस्ते ज्योति कदम यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मातृत्वाचा आणि संस्कारांचा गौरव

आई म्हणजे केवळ कुटुंबाची आधारवड नसून मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी संस्कारशक्ती असते. मुलांच्या यशामागे आईचा त्याग, कष्ट आणि संस्कार यांचे मोठे योगदान असते. अशाच मातृत्वाचा आणि कौटुंबिक मूल्यांचा गौरव पुणे येथील या विशेष कार्यक्रमात करण्यात आला.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याप्रसंगी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधव, उपाध्यक्ष ॲड. शार्दूल जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:15 01-09-2026