रस्त्यावर ट्रक उभा करून वाहतुकीला अडथळा; दोघांवर गुन्हे

रत्नागिरी ते पूर्णगड मार्गावर सार्वजनिक रस्त्यावर वाहने उभी केल्याप्रकरणी पूर्णगड पोलिसांची कारवाई

रत्नागिरी ते पूर्णगड मार्गावर सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक स्थितीत वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात दोघांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी या घटना घडल्या असून, दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पूर्णगड पोलीस करत आहेत.

टाटा इंट्रा पिकअप उभी केल्याप्रकरणी पहिला गुन्हा

पहिली घटना सायंकाळी ५.४८ वाजता रत्नागिरी ते पूर्णगड मार्गावर घडली. आरोपी फुलराम चुल्लीराम चौधरी (वय ३२) याने त्याच्या ताब्यातील टाटा इंट्रा पिकअप वाहन (क्रमांक MH 08 BP 6373) सार्वजनिक रस्त्यावर उभे केले होते. यामुळे इतर वाहनचालक व पादचाऱ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता होती. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कृष्णा बेदरेकर (वय ५०) यांच्या फिर्यादीवरून पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयशर ट्रक उभा केल्याप्रकरणी दुसरी कारवाई

दुसऱ्या घटनेत सायंकाळी ६.३० वाजता याच रस्त्यावर संशयित शिवकुमार मुल्लीमनी (वय १९) याने त्याच्या ताब्यातील आयशर ट्रक (क्रमांक MH 08 W 6055) सार्वजनिक रस्त्यावर उभा केला होता. यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना व पादचाऱ्यांना धोका निर्माण होईल, अशा स्थितीत ट्रक उभा केल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. याप्रकरणी प्रशांत गोविंद लोखंडकर (वय ३५) यांच्या फिर्यादीवरून पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:05 01-09-2026