Ratnagiri Sanskrit Adhyayan Kendra: संस्कृतच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी सामर्थ्य वाढवावे; डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरीत विशेष कार्यक्रम

रत्नागिरी:- “प्रत्येक व्यक्ती सामर्थ्यपूर्ण आहे. आधुनिक काळात संस्कृत भाषेला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून, प्रत्येकजण विविध प्रकारे या भाषेच्या समृद्धीसाठी योगदान देण्यास सक्षम आहे. त्यामुळे संस्कृत भाषेच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी आपले सामर्थ्य वाढवावे,” असे प्रतिपादन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र (रत्नागिरी उपकेंद्र) चे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले.

उपकेंद्रात आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात उपकेंद्रातील अधिकारी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी संस्कृत भाषेचा व्यवहारिक व कलात्मक वापर करत विविध उपक्रम सादर केले.

विविध वैविध्यपूर्ण सादरीकरणे:

  • संस्कृत गीत व बातम्या: उपकेंद्रातील लिपिक कल्पजा जोगळेकर यांनी मधुर संस्कृत गीत सादर केले, तर स्वरूप काणे यांनी संस्कृत भाषेतून वृत्तपत्र सदृश बातम्यांचे वाचन केले.
  • अभंग निरूपण: प्रा. अविनाश चव्हाण यांनी संत एकनाथ महाराजांच्या प्रसिद्ध अभंगाचे निरूपण संस्कृत भाषेतून मांडले.
  • योग व प्राणायाम प्रात्यक्षिक: प्रा. कानिफनाथ पंढरे व प्रा. रिया बिष्ट यांनी योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिक संस्कृतमधील सूचनांसह सादर केले.
  • शास्त्रज्ञान उलगडले: प्रकल्प साहाय्यक सई ओक यांनी धर्मशास्त्र तर जान्हवी पाध्ये यांनी संगीतशास्त्रातील गूढ मतितार्थ संस्कृतमधून स्पष्ट केला.
  • संस्कृत सुसंवाद: उपकेंद्रातील कक्ष अधिकारी प्रथमेश घोसाळे, कार्यालय साहाय्यक करण कीर व लिपिक अपर्णा कोकरे यांनी संपूर्ण सुसंवाद संस्कृत भाषेतून साधून उपस्थितांची मने जिंकली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:35 01-09-2026