Traffic Obstruction Case in Malgund: वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल; मालगुंड बाजारपेठेतील घटना

निष्काळजीपणे दुचाकी पार्क केल्याने जयगड पोलिसांची कारवाई

रत्नागिरी: तालुक्यातील मालगुंड बाजारपेठेत इतर वाहनांच्या वाहतुकीला अडथळा व धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने वाहन उभे करणाऱ्या दुचाकी चालकाविरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई १ सप्टेंबर रोजी रात्री ९.३७ वाजेच्या सुमारास करण्यात आली. राम मिलन (२६, रा. मालगुंड, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई निलेश गुरव यांनी जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलीस तक्रारीनुसार, मंगळवारी रात्री राम मिलन याने आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०२-झेड-११८२) मालगुंड बाजारपेठेत इतर वाहनांच्या वाहतुकीला अडथळा आणि अपघात घडेल अशा धोकादायक पद्धतीने पार्क केली होती. सार्वजनिक रस्त्यावरील रहदारीस अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 03-09-2026