Bhingoli Dapoli Phata Divider Demand : भिंगोळी-दापोली फाट्यावर डिव्हायडर आणि प्रवासी शेड उभारण्याची मागणी

Bhingoli Dapoli Phata Divider Demand : भिंगोळी-दापोली फाट्यावर डिव्हायडर आणि प्रवासी शेड उभारण्याची मागणी

मंडणगड शहराच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; खासदार सुनील तटकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद

मंडणगड:

मंडणगड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या भिंगोळी येथील दापोली फाट्यावर वाहतुकीची सुरक्षा वाढवणे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी डिव्हायडर उभारणे, प्रवासी शेड बांधणे तसेच या परिसराचे सुशोभिकीकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश पदाधिकारी ॲड. राकेश साळुंखे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे अधिकृत निवेदनाद्वारे आग्रही मागणी केली आहे.

अपघाताचा धोका टाळण्यासाठी डिव्हायडरची आवश्यकता
या संदर्भात माहिती देताना ॲड. राकेश साळुंखे यांनी सांगितले की, भिंगोळी येथील दापोली फाटा हा मंडणगड शहरात प्रवेश करण्याचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या चौकातून मंडणगड, दापोली व खेड येथून मुंबई-पुण्याकडे जाणारी तसेच तालुक्यातील विविध गावांकडे जाणारी वाहतूक सतत सुरू असते. यामुळे या ठिकाणची वर्दळ मोठी असून अपघाताचा धोका लक्षात घेता रस्त्याच्या मध्यभागी डिव्हायडर उभारणे अत्यंत आवश्यक आहे.

Arihant 4

याशिवाय, या फाट्यावर प्रवासी बस व इतर वाहनांची प्रतीक्षा करत बऱ्याच वेळा उभे असतात, यासाठी येथे प्रवासी शेड उभारणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मंडणगड तालुक्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार करता शहराच्या या प्रवेशद्वार परिसराचे सुशोभिकीकरण होणेही गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या तिन्ही महत्त्वाच्या मागण्यांची दखल घेऊन खासदार सुनील तटकरे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती ॲड. साळुंखे यांनी दिली आहे.