मच्छीमार्केट परिसरात निष्काळजीपणे वाहने उभी केल्याने कारवाई
रत्नागिरी: शहरातील गजबजलेल्या मच्छीमार्केट परिसरात इतर वाहनांच्या वाहतुकीला अडथळा व धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या दोन टेम्पो चालकांवर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मंगळवार, १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ६.३५ वाजेच्या कालावधीत करण्यात आली. अमोल रमेश शिरधनकर (४५, रा. अलावा जाकिमिऱ्या, रत्नागिरी) याने आपल्या ताब्यातील टेम्पो (एमएच-०८-एपी-१२२३) आणि असलम फत्तेमोहम्मद खान (३७, रा. मिरजोळे, रत्नागिरी) याने आपल्या ताब्यातील टेम्पो (एमएच-०८-बीके-७७७१) मच्छीमार्केट परिसरात बेजबाबदारपणे उभा केला होता.
या दोन्ही संशयित चालकांनी सार्वजनिक रस्त्यावर इतर वाहनांच्या वाहतुकीला अडथळा तसेच अपघात घडेल असा धोका निर्माण केल्याचे आढळल्याने पोलिसांकडून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 03-09-2026














