रत्नागिरी : पोस्ट विभागाची ‘इनॅच’ सुविधा

रत्नागिरी : टपाल खात्याद्वारे आयपीपीबी (इंडिया पोस्ट पेमेंट बँक) मार्फत इनॅच (इलेक्ट्रॉनिक नॅशनल ऑटोमेटेड क्लिंअरिंग हाऊस) ची सुविधा सुरु करण्यात आली आहे.

आयपीपीबी च्या खात्यामधून ग्राहकांना आता त्यांचे मासिक रिकरिंग खर्च, कर्ज, एसआयपी तसेच अन्य हप्ते परस्पर एका ठराविक तारखेला दरमहा भरण्याची सुविधा सुरु झाली आहे. टपाल खात्यामध्ये बचत ठेव, सुकन्या समृद्धी योजना, भविष्य निर्वाह निधी ठेव, आवर्ती ठेव, मुदत ठेव, किसान विकास पत्र, राष्ट्रीय प्रमाण पत्र इत्यादी योजनांमध्ये गुंतवणूक करून आपले भविष्य सुरक्षित करावे.

पोस्ट ऑफिसच्या सेवांचा व शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर, एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 08/Nov/2024