- पुण्यातील विद्यानंद बापट यांच्या डीजे बंदीच्या मागणीला योगेश कदम यांचे प्रत्युत्तर
मुंबई : हिंदू सण साजरे करताना कोणताही आवाज बंद होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी एका दहीहंडी कार्यक्रमात बोलताना मांडली आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील ध्वनिप्रदूषणाच्या विषयाला नव्याने तोंड फुटले असून राजकीय व सामाजिक वर्तुळात वादाला सुरुवात झाली आहे.
Hindu Festivals Sound Statement आणि डीजे बंदीची पार्श्वभूमी
ध्वनिप्रदूषणामुळे राज्यात डीजेवर बंदी घातली जावी, अशी मागणी पुण्यातील विद्यानंद बापट यांनी मांडली होती. त्या विधानाचा समाचार घेताना गृह राज्यमंत्री कदम यांनी, “हिंदू सण आणि उत्सव हे परंपरेनुसार आणि उत्साहात साजरे होणारच,” असे ठामपणे स्पष्ट केले.
डीजेविरोधात मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील डीजेविरोधात मत मांडले आहे. सण आणि उत्सवांमध्ये सुरू झालेल्या ‘डीजे’सारख्या काही चुकीच्या पद्धती एकदम बंद करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 07-09-2026














