देवरूख पोलिसांची धडक कारवाई; रोख रक्कमेसह जुगार साहित्य जप्त
देवरूख (विशेष बातमीदार): संगमेश्वर तालुक्यातील साखरपा-भंडारवाडी तिठ्याजवळील एका भंगार दुकानाच्या आडोषाल चालणाऱ्या कल्याण मटका जुगारावर देवरूख पोलिसांनी छापा टाकून धडक कारवाई केली आहे. शनिवारी, ५ सप्टेंबर रोजी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईत एका वृद्धाविरुद्ध देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sakharpa Matka Gambling Action: १ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ताराम विश्राम चाळके (वय ६५, रा. कोंडगाव, सोनारगल्ली, ता. संगमेश्वर) हा संशयित कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम बाळगून बेकायदेशीरपणे जुगार चालवताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून १ हजार रुपये रोख रक्कम आणि इतर जुगार साहित्य असा एकूण १ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमानुसार कारवाई
या कारवाईबाबत देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद अनंत वाघाटे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपीविरोधात गुन्हा क्रमांक १४४/२०२६ अंतर्गत महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ मधील कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून देवरूख पोलीस पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:00 07-09-2026














