Ratnagiri Rainfall Update: रत्नागिरी जिल्ह्यात तीन महिन्यांत ७५ टक्के पाऊस; गतवर्षीपेक्षा यंदा ८३७.१७ मि.मी. पावसाची तूट

यंदा पावसाची २४.७२ टक्क्यांची तूट; सप्टेंबर महिन्यातील मोठ्या पावसाकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष

रत्नागिरी (विशेष बातमीदार): कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात १ जून ते ६ सप्टेंबरदरम्यान २ हजार ५२७ मि.मी. सरासरी म्हणजेच ७५.१२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ३ हजार ३५६ मि.मी. म्हणजेच ९९.७८ टक्के पाऊस पडला होता. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ३ हजार ३६४.२२ मि.मी. इतकी असून, त्याच्या तुलनेत तब्बल ८३७.१७ मि.मी. पावसाची तूट निर्माण झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २४.७२ टक्के पाऊस कमी झाला आहे.

Ratnagiri Rainfall Update: जूनमध्ये हुलकावणी, जुलैमध्ये धुवांधार तर ऑगस्टमध्ये निराशा

यंदा मान्सून वेळेवर दाखल होऊनही म्हणावा तसा पाऊस झाला नाही. ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात १८ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या आणि धरणे तुडुंब भरली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच ५२ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर भात व नाचणीची पुनर्लागवड करण्यात आली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने भातपिके धोक्यात आली होती.

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी (टक्केवारी)

जिल्ह्यात तालुकानिहाय पावसाची परिस्थिती खालीलप्रमाणे आहे:

तालुकायंदाची टक्केवारीगतवर्षीची टक्केवारी
मंडणगड६९.५८%८४.८३%
दापोली७७.७७%९४.३%
खेड९०.८७%११०.८६%
गुहागर८४.८९%१००.६२%
चिपळूण८६.६७%१०६.८६%
संगमेश्वर६४.४४%९८.६२%
रत्नागिरी६९.०९%९८.१०%
लांजा६७.२३%९९.९१%
राजापूर६६.९१%१०६.६%
एकूण७५.१२%९९.७८%

खेडमध्ये सर्वाधिक, तर रत्नागिरीत सर्वात कमी पाऊस

तालुकानिहाय पाहता खेड तालुक्यात सर्वाधिक ३ हजार १९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, रत्नागिरी तालुक्यात सर्वात कमी १ हजार ९०० मि.मी. पाऊस पडला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसाने काही प्रमाणात समाधानकारक सुरुवात केली असली, तरी अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:00 07-09-2026