MNS Ratnagiri Dahihandi 2026: मनसे रत्नागिरी दहीहंडी उत्सव जल्लोषात; देवरूखच्या ‘जय बजरंग बली’ पथकाने ७ थर लावून पटकावला मान

राजापूरचे धूत पापेश्वर पथक उपविजेते; निवेंडीच्या महिला पथकाने फोडली मानाची हंडी

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) रत्नागिरी उप जिल्हा अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला मनसे दहीहंडी उत्सव २०२६ रत्नागिरीत अत्यंत जल्लोषात पार पडला. या स्पर्धेत देवरूख येथील ‘जय बजरंग बली’ गोविंदा पथकाने तब्बल ७ थर लावून मानाची दहीहंडी फोडण्याचा पराक्रम केला. तर राजापूरच्या ‘धूत पापेश्वर’ गोविंदा पथकाने उपविजेतेपद पटकावले.

MNS Ratnagiri Dahihandi 2026: महिला पथकाची विशेष हंडी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

या दहीहंडी उत्सवात महिलांसाठी विशेष हंडीचे आयोजन करण्यात आले होते. भगवतीनगर निवेंडी (गणपतीपुळे) येथील एकमेव महिला गोविंदा पथकाने ही मानाची हंडी फोडून प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली. महिला पथकाचा हा सहभाग संपूर्ण उत्सवातील विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नेत्रदीपक नियोजन

अतिशय उत्तम नियोजन, नेत्रदीपक रोषणाई, विविध नृत्याविष्कार आणि रत्नागिरीकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे मनसेची ही हंडी यंदाच्या रत्नागिरीतील दहीहंडी उत्सवात आगळीवेगळी आणि भव्यदिव्य ठरली.

या मनसे दहीहंडी उत्सव २०२६ च्या यशस्वी आयोजनासाठी मनसे उप जिल्हा अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहर आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिकांनी विशेष परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:39 07-09-2026