बौद्ध समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा १३ सप्टेंबर रोजी गौरव; शैक्षणिक मार्गदर्शन मेळाव्याचेही आयोजन

बुद्धिस्ट सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी महासंघाचा उपक्रम; विष्णुपंत जोगळेकर संकुलात रंगणार सोहळा

रत्नागिरी : बुद्धिस्ट सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी महासंघ, रत्नागिरी यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मधील रत्नागिरी जिल्ह्यातील बौद्ध समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व तज्ज्ञांचे शैक्षणिक मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता दामले विद्यालयाजवळ, मारुती मंदिर (नाचणे रोड), रत्नागिरी येथील ‘विष्णुपंत जोगळेकर संकुल’ येथे संपन्न होणार आहे.

या गुणवंतांचा होणार गौरव

शैक्षणिक, क्रीडा व कला क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या खालील निकषांनुसार विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे:

  • इयत्ता १० वी (SSC): ७०% पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी.
  • इयत्ता १२ वी (HSC): ६५% पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी.
  • शिष्यवृत्ती परीक्षा: पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थी.
  • क्रीडा व कला क्षेत्र: जिल्हा, राज्य अथवा राष्ट्रीय स्तरावर निवड झालेले व प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी.
  • उच्च शिक्षण व व्यावसायिक पदवी/पदविका: कोणत्याही शाखेतील पदवी, पदविका किंवा पदव्युत्तर शिक्षण (उदा. वकिली, इंजिनिअरिंग, डॉक्टर, नर्सिंग, फार्मसी, कृषी इत्यादी) संपादन केलेले विद्यार्थी.

या गौरव सोहळ्यासोबतच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तज्ज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.

उपस्थित राहण्याचे आवाहन

या सोहळ्यास बौद्ध समाजातील सर्व पात्र विद्यार्थी, विद्यार्थिनी, त्यांचे पालक, तसेच सामाजिक व धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष भास्कर के. कुरतडकर व सचिव शरद हि. कांबळे यांच्यासह कार्यकारिणीने केले आहे.

अधिक माहिती व संपर्कासाठी:

भास्कर कुरतडकर: ९४२३२९०१३३

शरद कांबळे: ९१५६०१५३४५

जे. पी. जाधव: ९९७०३३८६०६

सुनील पवार: ७५८८५५४९२२

सी. बी. मोहिते: ९४२२९६५५१९

एम. बी. कांबळे: ९४२२३७६३१७