मार्कंडी ते वडनाका भव्य मिरवणूक; पोलिसांचा चोख बंदोबस्त
चिपळूण : चिपळूण शहरातील मानाचा समजला जाणाऱ्या ‘चिपळूणचा महाराजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भव्य आणि मनमोहक गणेशमूर्तीचे शनिवारी आगमन मिरवणुकीद्वारे अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आले. पारंपरिक वाद्यांसह संबळ वाद्यांच्या गजराने संपूर्ण मिरवणूक मार्ग दुमदुमून गेला होता. डीजेच्या तालावर तरुणाईने उत्साहात ठेका धरत आगमन सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला.
Markandi to Vadnaka Grand Procession: मार्कंडी ते वडनाका भव्य मिरवणूक
‘चिपळूणचा महाराजा’ गणेशमूर्तीची स्थापना शहरातील वडनाका येथील श्री एकविरा मंदिराशेजारी करण्यात येते. या आगमन मिरवणुकीची सुरुवात मार्कंडी येथील श्री साई मंदिरापासून झाली. त्यानंतर वेस मारुती मंदिर आणि चिंचनाका मार्गे मिरवणूक वडनाका येथील मंडपात पोहोचली. या मिरवणुकीत ‘चिपळूणचा महाराजा’ मंडळाचे सर्व कार्यकर्ते नव्या आकर्षक टी-शर्टसह अनोख्या लूकमध्ये सहभागी झाले होते. शहरासह परिसरातील हजारो भाविकांनी आणि तरुणांनी या मिरवणुकीत गर्दी केली होती.
Dignitaries and Security: राजकीय नेते अन् पोलिसांचा चोख बंदोबस्त
या आगमन सोहळ्याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, नगरसेवक निहार कोवळे, मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बंड्याशेठ पेडणेकर, बंधू कदम, आकाश कदम, बाळा गुरव, तुषार गुरव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीदरम्यान शहर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
07:19 08-09-2026














