Dabhole Python Rescue Operation: दाभोळे बाजारपेठेत घराजवळ आढळला अजगर; वनविभागाकडून सुरक्षित सुटका

ग्रामस्थांची सतर्कता; वनविभागाने अजगराला दिले नैसर्गिक अधिवासात जीवनदान

दाभोळे : संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे बाजारपेठ येथील मुस्लिम मोहल्ला परिसरात एका नागरिकाच्या घराजवळ अचानक प्रचंड मोठा अजगर आढळल्याने घबराट पसरली होती. शरीफ साटवीलकर यांच्या घराशेजारी सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घरातील महिलेला हा अजगर निदर्शनास आला. महिलेने तत्काळ आरडाओरडा केल्यामुळे शेजारील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

Dabhole Python Rescue Operation: ग्रामस्थांनी दोन तास ठेवली अजगरावर नजर

अजगर सुरक्षित ठिकाणी राहावा आणि तो मानवी वस्तीतून इतरत्र निघून जाऊ नये यासाठी अब्दुल लांजेकर व स्थानिक ग्रामस्थांनी तब्बल दोन तास त्याच्यावर सातत्याने नजर ठेवून पहारा दिला. दरम्यान, ग्रामीण वार्ताचे पत्रकार सिकंदर फरास यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने वनविभागाला माहिती दिली.

वनविभागाचे कौशल्यपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन

घटनेची माहिती मिळताच संगमेश्वरचे वनपाल सागर गोसावी यांनी दाभोळेच्या वनरक्षक सुप्रिया काळे यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार डॉ. प्रितेश आडव आणि त्यांचे सहाय्यक सुयोग भेरे यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होत अत्यंत कौशल्याने अजगराला पकडले. वनविभागाच्या या जलद कारवाईमुळे आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला असून, स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
07:38 08-09-2026