Amba Ghat Road Damage: आंबा घाटात विसावा पॉईंटजवळ रस्ता खचला!

५० फूट संरक्षक कठडा दरीत कोसळला; एकेरी वाहतूक सुरू

Amba Ghat Road Damage मुळे रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात ओझरेखिंड आणि विसावा पॉईंटदरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विसावा पॉईंटजवळ सुमारे ५० फूट लांबीचा संरक्षक कठडा खोल दरीत कोसळला असून, रस्त्याची बाजूची पट्टी खचल्याने या मार्गावरील अपघाताचा धोका कमालीचा वाढला आहे.

ओझरेखिंड ते विसावा पॉईंट दरम्यानची सद्यस्थिती काही दिवसांपूर्वीच ओझरेखिंड परिसरात संरक्षक भिंत कोसळून रस्त्याला मोठा तडा गेला होता. ती घटना ताजी असतानाच आता विसावा पॉईंटजवळ रस्ता खचल्याने घाटातील वाहतुकीची बिकट अवस्था समोर आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने संबंधित ठिकाणी बॅरिकेट्स लावून एकेरी वाहतूक सुरू केली आहे. मात्र, केवळ बॅरिकेट्स लावून ही वाहतूक सुरू ठेवणे अत्यंत धोकादायक ठरत असल्याची प्रतिक्रिया वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे.

Amba Ghat Road Damage आणि केवळ ८ फूट रुंदीचा रस्ता घाटातील रस्ता खचल्यामुळे अनेक ठिकाणी उपलब्ध रस्त्याची रुंदी अवघी आठ फूट राहिली आहे. याच ८ फूट अरुंद रस्त्यावरून एसटी बस, चारचाकी आणि इतर लहान-मोठी वाहने मार्गक्रमण करत आहेत. अशा वेळी समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू (साइड) देताना अपघाताची भीती निर्माण होते. सततच्या पावसामुळे मातीची धूप वाढत असून, दाट धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे (Visibility) रात्रीच्या वेळी प्रवाशांचा धोका अधिकच वाढतो.

स्वतंत्र पथक आणि सुरक्षेची मागणी ओझरेखिंड येथे एसटी महामंडळ आणि वाहतूक पोलिसांचे पथक गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीवर नियंत्रण ठेवत आहे. परंतु, नव्याने खचलेल्या वळणावरही स्वतंत्र पथक नियुक्त करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे. तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी धोकादायक ठिकाणी कायमस्वरूपी बांधकाम होणे गरजेचे बनले आहे.

JMBR ACADEMY – ADMISSIONS OPEN!

वाहतूक प्रशासनाचे आवाहन आणि स्थानिक मागण्या प्रशासनाने केवळ तात्पुरती डागडुजी न करता तातडीने संरक्षक बांधकाम हाती घेऊन कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिक आणि नियमित प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकडून केली जात आहे. दरम्यान, घाटातून प्रवास करताना सर्व वाहनचालकांनी आपल्या वेगावर नियंत्रण ठेवावे, विशेष काळजी घ्यावी तसेच मुसळधार पाऊस किंवा दाट धुक्याच्या काळात शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:18 09-09-2026