गणेशोत्सवाच्या काळात चाकरमानी व स्थानिक नागरिकांसाठी आरोग्य सुविधा; जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लाभ घेण्याचे आवाहन
रत्नागिरी :
Shree Ganesha Arogyacha Campaign अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ रत्नागिरी जिल्ह्यातही करण्यात आला असून, जिल्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, शासकीय तसेच खाजगी आरोग्य यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि मुख्यमंत्री सचिवालय यांच्या विशेष समन्वयाने राबवले जात आहे. उपकेंद्रांपासून ते गणेशोत्सव मंडळांपर्यंत आरोग्य सुविधा
जिल्ह्यात उपकेंद्रांपासून ते थेट जिल्हा रुग्णालयापर्यंत, तसेच प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तपासणीदरम्यान गरज भासल्यास रुग्णांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक ते मार्गदर्शनही आरोग्य विभागाकडून केले जात आहे. Shree Ganesha Arogyacha Campaign आणि चाकरमान्यांसाठी उपयुक्त उपक्र म
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुणे आणि अन्य शहरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी मूळ गावी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होतात. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात उपलब्ध करून दिलेली ही आरोग्य तपासणीची सुविधा स्थानिक नागरिक तसेच चाकरमान्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरत आहे. वेळेत आरोग्य तपासणी करून संभाव्य आजारांचे त्वरित निदान करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.














