Cast Validity Certificate Special Drive: जातवैधता प्रमाणपत्राच्या त्रुटी पूर्ततेसाठी २२ आणि २४ सप्टेंबर रोजी विशेष मोहीम; रत्नागिरी जात पडताळणी समितीचे आवाहन

Cast Validity Certificate Special Drive: जातवैधता प्रमाणपत्राच्या त्रुटी पूर्ततेसाठी २२ आणि २४ सप्टेंबर रोजी विशेष मोहीम; रत्नागिरी जात पडताळणी समितीचे आवाहन

‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत उपक्रम; नीट, सीईटी आणि जेईईच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेतील अडचण दूर करण्यासाठी पुढाकार

रत्नागिरी:
Cast Validity Certificate Special Drive च्या अंतर्गत जातवैधता प्रमाणपत्राच्या अर्जांमधील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी येत्या २२ आणि २४ सप्टेंबर रोजी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने या विशेष मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.

व्यावसायिक परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष नियोजन

ज्या विद्यार्थ्यांचे जातवैधता प्रमाणपत्राचे अर्ज विविध त्रुटींमुळे प्रलंबित आहेत, त्यांनी समिती कार्यालयाशी संपर्क साधून या त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः नीट (NEET), सीईटी (CET), क्लॅट (CLAT) आणि जेईई (JEE) यांसारख्या व्यावसायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अडकलेले आहेत, त्यांच्यासाठी २२ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबर २०२६ हे विशेष दिवस निश्चित करण्यात आले आहेत.

infigo

या दिवशी संबंधित विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी सर्व मूळ कागदपत्रांसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहाणे आवश्यक आहे. याशिवाय, अन्य सर्व अर्जदारांना १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या महिनाभराच्या कालावधीत अर्जातील त्रुटी दूर करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Cast Validity Certificate Special Drive आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन

बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी समितीमार्फत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विशेष मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जातात.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी विविध प्रवेश परीक्षा दिल्या आहेत, परंतु अद्याप जातवैधता पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेला नाही, त्यांनी संभाव्य अडचणी टाळण्यासाठी तात्काळ अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या संशोधन अधिकाऱ्यांनी केले आहे.