Ramkand Fruit Food Poisoning: रामकंद फळ खाल्ल्याने वृद्ध महिला अस्वस्थ

मंडणगड तालुक्यातील निमदेवाडी येथील घटना; दापोलीतील प्राथमिक उपचारांनंतर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवले

रत्नागिरी :

मंडणगड तालुक्यातील तिडे-निमदेवाडी येथे रामकंद नावाचे जंगली/स्थानिक फळ खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडलेल्या एका ६८ वर्षीय वृद्ध महिलेला अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखील करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी (१ ऑक्टोबर) सकाळी घडली.

लक्ष्मी पांडुरंग निमदे (वय ६८, रा. निमदेवाडी-तिडे, ता. मंडणगड) असे अस्वस्थ झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

Shanti2

फळ खाल्ल्यानंतर अचानक वाटू लागले अस्वस्थ

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी निमदे यांनी गुरुवारी सकाळी रामकंद नावाचे फळ खाल्ले होते. फळ खाल्ल्यानंतर काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि विषबाधेसारखी लक्षणे दिसून येऊ लागली.

नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी दापोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, अधिक वैद्यकीय उपचाराची गरज भासल्याने त्यांना रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 03-10-2026