Kumbharli Ghat Road Warning : कुंभार्ली घातातील खड्डे तातडीने न भरल्यास खुर्चीत बसू देणार नाही; मनसेचा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक इशारा

Kumbharli Ghat Road Warning : कुंभार्ली घातातील खड्डे तातडीने न भरल्यास खुर्चीत बसू देणार नाही; मनसेचा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक इशारा

जीवघेण्या खड्ड्यांमुळे चाकरमानी व वाहनचालक त्रस्त; मनसे वाहतूक सेनेच्या वतीने उपअभियंत्यांकडे निवेदन

Kumbharli Ghat Road Warning : कोकण आणि पश्चिम घाटाला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कुंभार्ली घाताची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, रस्त्यावरील जीवघेणे खड्डे त्वरित न भरल्यास अधिकाऱ्यांना खुर्चीत बसू देणार नाही, असा कडक इशारा मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राज्यू खेतले यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. यासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने उपअभियंता वृषाली पाटील यांना निवेदन देत जाब विचारला आहे.

घाटातील खड्ड्यांमुळे वाहतुकीला मोठा धोका
कुंभार्ली घाटातील डेंजर झोन असलेल्या वळणांवरच मोठे-मोठे खड्डे पडले असून, त्याकडे महामार्ग प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. आज हजारो वाहने या घाटातून ये-जा करत असून शेकडो रुग्ण उपचारासाठी याच मार्गाने जात असतात. मात्र, अत्त्यवस्थ रुग्ण घेऊन जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अनेक छोट्या गाड्या खड्ड्यात अडकून बंद पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. जीवघेणे खड्डे बुजविण्याचे सोडून रस्त्याच्या बाजूला भिंती कशा बांधता? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

आठ दिवसांचा अल्टीमेटम; आंदोलनाचा इशारा
येत्या आठ दिवसांत कुंभार्ली घातातील सर्व खड्डे भरण्यात आले नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांना कार्यालयात काम करू देणार नाही आणि ठेकेदारालाही घाटात काम करू देणार नाही, असा स्पष्ट इशारा मनसेने दिला आहे. यावेळी उपअभियंता वृषाली पाटील यांनी आपण तात्काळ खड्डे भरण्याचे काम हाती घ्यायला सांगतो, असे आश्वासन दिल्याचे समजते.

Arihant 4

या शिष्टमंडळात मनसे वाहतूक जिल्हाध्यक्ष राज्यू खेतले यांच्या नेतृत्वाखाली ॲड. वृषाली सावंत, माजी शहराध्यक्ष राजेंद्र गोंजारी, विनोद चिपळूणकर, ज्ञानेश्वर पवार, अल्ताफ शेख, मस्तकिन शहा, मनोज साळुंखे, संतोष मठपती, कासिम सय्यद, नईम शहा, चांद शहा, गणेश खेडेकर, उमेश पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.