Rajmata Jijau Bus Digital Boards Failure: रत्नागिरीतील ‘जिजाऊ’ बसचे डिजिटल फलक बंद; प्रवाशांची हेळसांड होत असल्याने लाखांचा खर्च पाण्यात

Rajmata Jijau Bus Digital Boards Failure: रत्नागिरीतील 'जिजाऊ' बसचे डिजिटल फलक बंद; प्रवाशांची हेळसांड होत असल्याने लाखांचा खर्च पाण्यात

बसमधील स्क्रीन बंद असल्याने जुन्या पाट्यांचा आधार; रात्रीच्या वेळी अक्षरे दिसतात धूसर, प्रवाशांमधून तीव्र संताप

रत्नागिरी : Rajmata Jijau Bus Digital Boards Failure संदर्भात रत्नागिरी विभागात नुकत्याच नव्या दाखल झालेल्या अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ एसटी बसेसमधील प्रवाशांच्या सोयीसाठी बसवण्यात आलेले डिजिटल फलक (Digital Boards) सध्या पूर्णपणे बंद पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बसमधील मार्गाची माहिती देणारी डिजिटल यंत्रणा आणि स्क्रीन बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या या आधुनिक यंत्रणेचा कोणताही उपयोग होत नसल्याने एसटी महामंडळाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

रत्नागिरी विभागातील ९ आगारांना नव्याने तीन बाय दोन आसनी ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी मिळाल्या आहेत. या बसेसमध्ये प्रवाशांच्या माहितीसाठी डिजिटल मार्गदर्शक फलक बसवण्यात आले होते; मात्र योग्य देखभाल व तांत्रिक तपासणी अभावी हे फलक कार्यान्वित नसल्यामुळे प्रवाशांना याचा लाभ मिळत नाही. परिणामी, जुन्या पद्धतीच्या पाट्या लावण्याची वेळ आली असून, रात्रीच्या अंधारात जुन्या पाट्यांवरची अक्षरे अत्यंत धूसर दिसत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

लाखांचा खर्च कागदावरच; सार्वजनिक घोषणा यंत्रणाही ठप्प
एसटी महामंडळाकडून बसेसमध्ये प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा देण्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात त्या किती कार्यान्वित आहेत याची खात्री करणे गरजेचे बनले आहे. या बसेसमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘पब्लिक अनाउन्समंट सिस्टीम’ (Sound System) देखील बसवण्यात आली आहे; मात्र प्रत्यक्षात याचा वापरच केला जात नाही. वाहक स्वतः मोठ्या आवाजात स्टॉपची नावे सांगत असतात.

Mobile hub

याशिवाय, बसमध्ये मोफत मोबाईल चार्जिंगची सोय असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात चार्जिंग होत नसल्याच्या तक्रारीही प्रवासी करत आहेत. पहिल्यांदाच प्रवास करणारे प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी बसचा मार्ग व वेळेची माहिती अत्यंत महत्त्वाची असते. डिजिटल फलक आणि साऊंड सिस्टीम बंद असल्यामुळे गर्दीच्या वेळी वाहकाकडे चौकशी करताना प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे प्रशासनाने तांत्रिक विभागामार्फत लक्ष देऊन हे बंद असलेले डिजिटल फलक आणि सुविधा ताраtने चालू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून जोर धरत आहे.