Konkan agriculture news : ऐन भात कापणीच्या हंगामात पावसाचा तडाखा!

Konkan agriculture news : ऐन भात कापणीच्या हंगामात पावसाचा तडाखा!

शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी..

दापोली – दापोली तालुक्यात २ नोव्हेंबर रोजी रात्री तसेच पहाटेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऐन भात कापणीच्या हंगामात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर पावसाने वेळेआधीच दडी मारली होती. अनेक दिवस पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत होते. त्यानंतर भातपीक तयार झाल्याने शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली होती. काही शेतकऱ्यांचे भात कापून शेतातच होते, तर काही ठिकाणी कापणी केलेल्या भाताच्या पेंढ्या शेतात पडून होत्या.

मात्र, २ नोव्हेंबरच्या रात्री आणि पहाटे अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे कापणी केलेले भात भिजले आहे. भात भिजल्यामुळे धान्यांचा दर्जा घसरण्याची तसेच उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. आधी पावसाच्या खंडामुळे आणि आता कापणीच्या ऐनवेळी झालेल्या पावसामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Amey jwelrs