Ratnagiri Municipal Council: रत्नागिरी शहरात हॉॅकर्सझोनमध्ये न जाणाऱ्या फेरीवाल्यांवर आजपासून कारवाई

Ratnagiri Municipal Council: रत्नागिरी शहरात हॉॅकर्सझोनमध्ये न जाणाऱ्या फेरीवाल्यांवर आजपासून कारवाई

रत्नागिरी नगरपरिषदेची कठोर भूमिका; रस्ते आणि फुटपाथ अडवणाऱ्या फेरीवाल्यांना सूचनेनंतर दंडात्मक व जप्तीची कारवाईचा इशारा

रत्नागिरी – रत्नागिरी शहरातील रस्ते आणि फुटपाथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांना मंगळवारपासून निश्चित केलेल्या दोन हॉॅकर्सझोनच्या ठिकाणी जाऊन आपापल्या जागा मिळवून घ्या, अशी नम्र विनंती रत्नागिरी नगरपरिषदेच्या मालमत्ता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक फेरीवाल्याची भेट घेऊन केली आहे. हॉॅकर्सझोनमध्ये जाण्याची विनंती करतानाच, मंगळवारपासून हॉॅकर्सझोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

रत्नागिरी शहरातील रस्ते आधीच अपुरे पडत आहेत, त्यातच फेरीवाले, टपरीवाले यांनी रस्ते आणि फुटपाथ अडवून ठेवल्यामुळे वाहनांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर ‘स्मार्टसिटी’चा उद्देश साध्य करताना शहराचे होणारे विद्रूपकरणही नकोसे वाटणारे आहे. यावर उपाय म्हणून शनिवार आणि मंगळवार आठवडाबाजारच्या ठिकाणी रत्नागिरी नगरपरिषदेने हॉॅकर्सझोन निश्चित केले आहेत. या दोन झोनमध्ये जे फेरीवाले मंगळवारपासून जाणार नाहीत, त्यांच्यावर अतिक्रमण हटाव मोहीम पथकाकडून थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

रत्नागिरी नगरपरिषद मालमत्ता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी शहरातील बहुसंख्य फेरीवाल्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मंगळवारपासून हॉॅकर्सझोनमध्ये जाऊन जागा निश्चित करून घेण्याचे आवाहन केले होते. परंतु, जे फेरीवाले या आदेशाचे पालन करून हॉॅकर्सझोनमध्ये जाणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मालमत्ता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

Shanti real estate 1