रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याची कारवाई; महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद
रत्नागिरी – रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ८४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना १ नोव्हेंबर रोजी रात्री ८:१० वाजता उद्यमनगर ते चंपक मैदान मार्गावरील सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला घडली. या प्रकरणी शेबांशू सुनील किरलेकर (३३, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडे ७५० मिली क्षमतेची ट्युबर्ग कंपनीची बिअरची बाटली आढळून आली.
दुसरी घटना याच परिसरात रात्री ८:३० वाजता घडली. या प्रकरणी आकाश प्रकाश दूर्वे (२५, रा. फगरवठाार, रत्नागिरी) याच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या अशा गैरप्रकारांमुळे पोलिसांकडून कडक पावले उचलण्यात येत आहेत.














