चंदेराई प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ घडली घटना; पोलिसांकडून कसून शोध सुरू
रत्नागिरी :
रत्नागिरीमध्ये एक्स-रे काढण्यासाठी जात असल्याचे सांगून घरून निघून गेलेल्या एका २९ वर्षीय तरुणीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस यंत्रणेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, जान्हवी समीर भाटकर (वय २९) असे अपहरित झालेल्या तरुण तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी काजोल संदेश सुर्वे (रा. बापाटोळे तोणडे, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भातील खबर दिली आहे. अपहृत तरुणी जान्हवी ही चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार घेत होती. सोमवारी दुपारी ती गुडघ्याचा एक्स-रे काढण्यासाठी रत्नागिरी येथे जात असल्याचे घरी सांगून एसटी बसमध्ये बसून निघून गेली होती.
मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी न परतल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही. ती साजरी न सापडल्याने आणि संशयास्पद परिस्थिती निर्माण झाल्याने शेवटी नातेवाईकांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला असून, तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाकडून कसून तपास केला जात आहे.














