Ratnagiri Police Campaign: ‘ऑपरेशन टेप फॉर सेफ’ अंतर्गत महामार्गावरील ब्लॅक स्पॉटची पाहणी

Ratnagiri Police Campaign: 'ऑपरेशन टेप फॉर सेफ' अंतर्गत महामार्गावरील ब्लॅक स्पॉटची पाहणी

लांजा, संगमेश्वर व राजापूर परिसरात उपाययोजना; पुढील १० दिवसांत हायमास्ट लाईट्स बसवणार

Ratnagiri Police Campaign अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील वाढत्या अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रभारी पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर थेट महामार्गावरील अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

लांजा तालुक्यातील आंजणारी तसेच संगमेश्वर व राजापूर परिसरात महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही विशेष पाहणी मोहीम राबवण्यात आली. या पाहणीदरम्यान अतिरिक्त पोलिस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, महामार्ग पोलिस विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Ratnagiri Police Campaign: आतापर्यंतच्या उपाययोजना आणि नवे नियोजन
महामार्गावर यापूर्वीच १५० रंबलर आणि २०० मीटर लांबीची डिव्हायडर/मेडियन भिंत उभारण्यात आली आहे. याशिवाय ‘गो स्लो’, ‘स्पीड लिमिट’, ‘तीव्र उतार’ आणि ‘नो न्यूट्रल’ असे दिशादर्शक फलकही बसवण्यात आले आहेत.

Shoping fiesta

रात्रीच्या वेळी दृश्यमानता वाढवून अपघातांचा धोका टाळण्यासाठी महामार्गावर पुढील १० दिवसांत हायमास्ट लाईट्स बसवण्यात येणार आहेत. अपघातप्रवण क्षेत्रात यापूर्वी तीन ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवले असून, लवकरच आणखी ८ ते ९ नवीन ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवले जाणार आहेत. तसेच डायनॅमिक स्पीड इंडिकेटर बसवण्याचा प्रस्ताव सुरक्षा समिती रत्नागिरी आणि अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.