६० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना कारवाई; न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलिस कोठडी
Ratnagiri Bribe Case मध्ये परदेशी जहाजाला पोर्ट क्लिअरन्स सर्टिफिकेट आणि आवश्यक चाचण्यांची परवानगी देण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागून पहिला हप्ता म्हणून ६० हजार रुपये स्वीकारणाऱ्या प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यासह त्याच्या पंटरला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. रत्नागिरी शहरात घडलेल्या या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या शाखेने दोघांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते.
संदीप विलासराव भुजबळ असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या प्रादेशिक बंदर अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यासोबत खाजगी इसम मिलिंद तुकाराम बनप (वय ५३, रा. घाणेकर आळी, रत्नागिरी) याच्यावरही ही कारवाई करण्यात आली आहे.
Ratnagiri Bribe Case: सी ट्रायल व क्लिअरन्ससाठी लाचेची मागणी
तक्रारदाराच्या एजन्सीने एका नादुरुस्त परदेशी जहाजाची दुरुस्ती पूर्ण केली होती. या जहाजाची समुद्रात चाचणी (सी ट्रायल) घेण्याची परवानगी देण्यासाठी तसेच जहाजाला पोर्ट क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ यांनी ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

मागितलेल्या ८० हजार रुपयांच्या लाचेपैकी ६० हजार रुपयांचा पहिला हप्ता खाजगी इसम मिलिंद बनप याने स्वीकारला होता. लाचलुचपत विभागाच्या शाखेने या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्याचा आदेश दिला.













