रत्नागिरीच्या मच्छीमार बांधवांसाठी मोठी खुशखबर! काळबादेवी आणि जाकीमिऱ्या येथील पाईल जेट्टी बांधकामाची ई-निविदा प्रसिद्ध; तब्बल २३ कोटींहून अधिक निधीची कामे मार्गी

रत्नागिरीच्या मच्छीमार बांधवांसाठी मोठी खुशखबर! काळबादेवी आणि जाकीमिऱ्या येथील पाईल जेट्टी बांधकामाची ई-निविदा प्रसिद्ध; तब्बल २३ कोटींहून अधिक निधीची कामे मार्गी

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे आणि पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या पाठपुराव्याला यश; महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे निविदा प्रक्रिया सुरू

रत्नागिरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आणि पाठपुराव्यातून रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी आणि जाकीमिऱ्या येथील मच्छीमारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली पाईल जेट्टी बांधकामाची कामे आता प्रत्यक्ष मार्गी लागली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग (बंदरे व परिवहन) अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र सागरी मंडळाने (Maharashtra Maritime Board) या दोन्ही कामांसाठी अधिकृत ई-निविदा प्रसिद्ध केली आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी मिळून सुमारे २३ कोटी १६ लाख रुपयांहून अधिक निधी खर्च होणार असून, त्यामुळे स्थानिक मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे दोन्ही कामांची ई-निविदा प्रसिद्ध :

मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागातील नोंदणीकृत व अनुभवी ठेकेदारांकडून बी-१ नमुन्यात या कामांसाठी ई-निविदा (mahatenders.gov.in)
https://mahatenders.gov.in)
मागविण्यात आल्या आहेत. या कामांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:

Horizon techno.

१) काळबादेवी येथे पाईल जेट्टी बांधकाम करणे (ता. जि. रत्नागिरी) :
या कामाच्या निविदेची अंदाजित किंमत १२ कोटी १ लाख ६२ हजार ५१४ रुपये इतकी आहे. या निविदेसाठी इसारा रक्कम ६,०१,००० रुपये असून कोऱ्या निविदेची किंमत ३,५४० रुपये ठेवण्यात आली आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी पावसाळा कालावधी धरून २४ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

२) जाकीमिऱ्या येथे पाईल जेट्टी बांधकाम करणे (ता. जि. रत्नागिरी) :
जाकीमिऱ्या येथील पाईल जेट्टीच्या बांधकामाची अंदाजित निविदा किंमत ११ कोटी १५ लाख ३ हजार २०३ रुपये इतकी आहे. हे काम पूर्ण करण्यासाठीही पावसाळा कालावधी धरून २४ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

स्थानिक मच्छीमार व बंदर विकासाला मिळणार चालना :

काळबादेवी आणि जाकीमिऱ्या या किनारी भागांतील मच्छीमारांकडून सुसज्ज जेट्टीची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रश्नाची दखल घेत निधी मंजूर करून निविदा प्रक्रिया सुरू केल्यामुळे या दोन्ही भागांतील मच्छीमार बांधवांच्या नौका उभ्या करण्याचा आणि मासे उतरवण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे.