रत्नागिरी : तालुक्यातील साखरतर मोहल्ला येथे एका चार जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना रविवार, १० नोव्हेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली.
सज्जाद सद्दाम होडेकर, अमर नाझीम मुल्ला (दोन्ही रा. साखरतर मोहल्ला, रत्नागिरी) आणि इतर दोन जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात जुहेर मोहम्मद हनिफ पटेल (वय २८, रा. राजीवडा बुडीये मस्जिदजवळ, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार रविवारी रात्री तो मावस बहिणीला साखतर येथील घरी सोडून परतत असताना सज्जाद होडेकरने फिर्यादीला तू इकडे का आलास, कोठून आलास असे विचारून हातातील लोखंडी फायटरने डोक्यात मारहाण केली. अमर मुल्लानेही त्याला हाताने मारहाण करून इतर दोघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. या प्रकरणी संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 13-11-2024














