खेड : येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बदलापूर येथील वृत्त निवेदिका दीपाली केळकर तसेच खेड येथील मुरली मनोहर पतसंस्थेचे चेअरमन संजय मोदी, माजी नगराध्यक्ष वैशाली कवळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दीपाली केळकर यांनी हास्य संजीवनी हा कार्यक्रम सादर केला.
जगण्यासाठी हसणे किती महत्त्वाचे आहे हे वेगवेगळी उदाहरणे देऊन व दाखले देऊन त्यांनीरसिकांना खिळवून ठेवले. यावेळी संघाचे अध्यक्ष आबा निकम, उपाध्यक्ष राजन दांडेकर, शशिकांत मेहता, इकबाल फकी, संतोष मेहता, भरत कारले, लढा, वैद्य, उज्ज्वला पाटणे, कोठारी, अरुणा कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 13/Nov/2024













