लांजा : बापेरे फाटा येथे बस-दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी

लांजा : एसटी बस आणि दुचाकी याची समोरासमोर धडक बसल्याने दुचाकीस्वार वसीम गवंडे हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात लांजा तालुक्यातील बापेरे फाटा येथे सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

लांजा येथुन साटवलीकडे लांजा शेळवी कडे जाणारी बस बापेरे फाट्यावर आली असता वसीम गवंडे राहणार साटवली हा दुचाकी घेऊन येत असताना बसच्या समोर जोरदार धडक बसून अपघात झाला. अपघातामध्ये वसीमच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. अपघाताची खबर मिळताच पोलीस प्रमुख निळकंठ बगळे यांनी सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:49 25-09-2024