शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ

पुणे : इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास ७ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दि. ९ फेब्रुवारी या एकाच दिवशी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे.

या परीक्षेसाठी शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीपर्यंत मुदत देण्यात आली होती.

त्यात वाढ करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ८ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येईल. अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत १६ डिसेंबर ते २३ डिसेंबर असून अति विशेष विलंब शुल्कासह २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे, असे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 02-12-2024

Infigo eyecare