गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील मंदिरा नजीक असलेल्या शासकीय विश्रामगृह इमारतीचे सध्या नव्याने दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम सुरू झाले आहे. यामुळे या इमारतीला आता नवा साज चढणार आहे.
गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरानजिकच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यारीत असलेली शासकीय विश्रामगृह इमारत आहे. या इमारतीला अनेक वर्ष झाल्यानंतर या इमारतीतील काही भाग दुरुस्तीसाठी आला होता. या भागाची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले असून, गेल्या अनेक दिवसांपासूनही कामे सुरू आहेत.
समुद्रावरून येणाऱ्या खाऱ्या हवेमुळे अनेक उपकरणे, ग्रील खराब होतात. यांच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे.
या इमारतीमधील खोल्यांची नव्याने दुरुस्ती तसेच इमारतीमधील दरवाजे खिडक्या, टॉयलेट – बाथरूम विद्युत उपकरणे आदींची कामे केली जात आहेत. संपूर्ण इमारतीला बाहेरून रंगरंगोटी करण्यात येत आहे.
या शासकीय विश्रामगृह इमारतीमध्ये अनेक मंत्री व विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी येत असतात. या इमारतीत नव्याने दुरुस्तीची कामे सुरू झाल्याने गेल्या काही दिवसांपासून येणाऱ्या विशेष दर्जाच्या व्यक्तींची अन् राहण्याची सोय करण्यात येत आहे दुरुस्ती आणि रंगरंगोटीची कामे पूर्ण झाल्यावर इमारतीला नवा साज चढणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 12/Dec/2024














