लांजा : तालुक्यातील आरगाव फौजदार वाडी येथे श्री गजानन खामकर आणि सारंगपाणी काशिराम खामकर कुटुंबीयांतर्फे शनिवारी १४ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी खामकर कुटुंबियांच्या वतीने श्री दत्त जयंती उत्सव हा साजरा केला जातो. या उत्सवांतर्गत शनिवारी सकाळी ११ वाऊ अभिषेक, तसेच सायंकाळी ५ ते ६ आरगाव व कुणणेगाव येथील वारकरी संप्रदाय व ग्रामस्थ यांचे भजन, ६ वाजता दत्त जन्म आणि त्यानंतर दिंडी मिरवणूक, आरती, रात्री ८ वाजता महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. रात्री फौजदारवाडी विकास मंडळाचे भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमासाठी फौजदारवाडी विकास मंडळ तसेच ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांचे सहकार्य लाभत आहे. या दत्त जयंती उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन खामकर कुटुंबीय आणि फौजदारवाडी विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 13/Dec/2024














