प्रा. डॉ. रवीचंद्र कांबळे यांनी ‘पाच ब्रह्मविहार’ या विषयावर केले धम्मप्रबोधन
रत्नागिरी : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा, सम्यक संबुद्ध मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा शाखा रत्नागिरी कारवांचीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास मालिकेतील १२ वे पुष्प कारवांचीवाडी मंडळाचे खजिनदार अशोक तांबे यांच्या निवासस्थानी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले.
कार्यक्रमप्रसंगी प्रवचनकार प्रा. डॉ. रवीचंद्र कांबळे यांनी ‘पाच ब्रह्मविहार’ या विषयावर सोप्या भाषेत कथा आणि गोष्टींच्या माध्यमातून उपस्थितांना धम्मप्रबोधन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांनी बुद्धवंदना घेतली.
विविध उपक्रम आणि मान्यवरांची उपस्थिती
या वर्षावास कार्यक्रमात कारवांचीवाडी मंडळाचे उपाध्यक्ष विलास तायडे व त्यांच्या कुटुंबीयांनी महाभोजनदान दिले, तर अनिल मोरे यांच्या वतीने गोड लाडूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी आपल्या निवासस्थानी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल अशोक तांबे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांचे उपस्थितांकडून आभार मानण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आणि आयोजन
हा संपूर्ण सोहळा कारवांचीवाडी मंडळाचे अध्यक्ष बळीराम गवई आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा अनुष्का मोरे यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या प्रसंगी तालुका कमिटीचे प्रमुख पदाधिकारी, समाजातील प्रतिष्ठित मान्यवर आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.













