शाळा तपासण्यासाठी ‘ते’ ७२ मुद्दे पाहणे आवश्यक : डॉ. विनय नातू

चिपळूण : एखाद्या शाळेचे कामकाज कसे चालू आहे हे तपासायचे असेल तर किमान ७२ मुद्दे पाहावे लागतात. शैक्षणिक, प्रशासकीय आणि इतर कामकाजाचाही यात समावेश असतो. यासाठी कोणती रजिस्टर बारकाईने तपासायची म्हणजे शाळेची गुणवत्ता आणि तेथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता आणि कौशल्य याचा नेमका अंदाज घेता येतो. हा धडा मला रामभाऊ साठे यांनी दिला. आयुष्यात शैक्षणिक संस्था चालवताना त्यांनी शिकवलेल्या या मार्गावरूनच आम्ही चाललो, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केले.

मालघर येथे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या रामभाऊ साठे उर्फ साठेसर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. नातू यांचे वडील तात्या नातू आणि साठे यांनी तालुक्यात शैक्षणिक संस्थांमार्फत सुमारे २५ शाळा सुरू केल्या. आजही नातू प्रतिष्ठानतर्फे आणि इतर संस्थांतर्फे या शाळांचा कारभार सुरू आहे. त्याची पायाभरणी साठे यांनी केली. कारण, तात्या नातू यांनी संस्था चालवण्यासाठीचे जणू सर्वाधिकार साठे यांना दिले होते.

संस्था चालवतानाची त्यांची तडफ, तळमळ आणि दूरदृष्टी यामुळे रामपूर शाळेचेच नव्हे तर संस्थेचे पालकत्वही साठे सरांकडे होते. त्या काळात एकाच संस्थेच्या छताखाली शाळा न चालवता वेगवेगळ्या संस्था निर्माण केल्या. नाहीतर जिल्ह्यातील सर्वाधिक शाळा असलेली ही संस्था झाली असती; मात्र कारभार करण्याचे अधिकार पूर्ण विश्वास टाकून यायचे म्हणजे एका अर्थाने विकेंद्रीकरण करायचे. त्यावर अंमल हा रामपूर एज्युकेशन सोसायटीतूनच होत होता. त्या काळात एसटी तिकिटावर अपॉइंटमेंट असायची. गरज पडती तर बदली आदेशही निघायचा, मात्र साठेसरांची अदब अशी होती की, संबंधित शिक्षक बदलीच्या ठिकाणी निमूट जायचा, अशी आठवणही नातू यांनी सांगितली.

दप्तर कोणती तपासायची…
शाळा तपासताना कोणती रजिस्टर बघायची याचे नमुने त्यांनी सांगितले होते. कोणते कोपरे बघायचे, हेही सांगितले होते. शाळेत ग्रंथालय असते. किमान असावे. त्यातील पुस्तक देवघेव रजिस्टर बघायचे. मुलांनी किती पुस्तके नेली, शिक्षकांनी किती पुस्तके वाचली याचा अंदाज येतो, हे उदाहरण नातूंनी देताच खसखस पिकली

Khabardar diwali fest

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:15 PM 13/Dec/2024