गुहागर : वरचापाट येथील दत्त मंदिरात १८ डिसेंबरपर्यंत कार्यक्रम

गुहागर : वरचापाट येथील श्री दत्त प्रासादिक मंडळाच्या वतीने श्री दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सवानिमित्त १८ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमांसाठी भक्तजनांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन श्री प्रासादिक मंडळ गुहागर वरचापाटचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी केले आहे.

यानिमित्त १४ रोजी स. ६ ते ६.३० वा. काकड आरती, सकाळी ७ ते ८ वा. श्रींची पूजा, सकाळी ९ ते ९.३० वा. श्रींची वारी व भजन, स. ९.३० ते १२.३० वा. गावातील वारी, दु. १२.३० ते १.३० वा. पोथी वाचन व जन्मकाळ, दु. १.३० ते २.३० वा. महाप्रसाद, संगीत भजने सायं. ४ ते ५.३० वा. सिद्धकला भजन मंडळ, गुहागर यांचे भजन, सायं. ५.३० ते ६.३० वा. पिंपळादेवी महिला भजन मंडळ वरचापाट यांचे भजन, रात्रौ. १० वा. श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ वरचापाट यांचे भजन, १५ रोजी रात्रौ. १० वा. श्रीदत्त प्रासादिक भजन मंडळ वरचा पाट यांचे भजन, रात्रौ ११ वा. श्रींच्या पालखीची मिरवणूक, १७ रोजी रात्रौ. १०.४० वा. टॅक्स फ्री व साडी उडाली आकाशी या एकांकिका, १८ रोजी रात्रौ. १०.३० वा. स्थानिक कलाकारांचे मनोरंजनाचे कार्यक्रम व मंगळागौर.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 14/Dec/2024