खेड : खेड ते रेल्वेस्थानक मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे केल्याप्रकरणी विनोद विठ्ठल कदम (४२ रा. केळणे-बौद्धबाडी) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याने आपल्या ताब्यातील बेलोरो पिकअप (एम.एच. ०८ ए.पी. २८९७) चारचाकी वाहन रस्त्याच्या मधोमध रहदारीच्या ठिकाणी उभे केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई संपत गीते यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:56 PM 14/Dec/2024














