खेड : कोकण मार्गावर धावणाऱ्या सहा एक्स्प्रेस गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. या गाड्यांच्या जनरल डब्यांमध्ये कपात करण्यात आली आहे. १६३३४/१६३३३ तिरूअनंतपूरम-वेरावल क्रमांकाची एक्स्प्रेस २६ डिसेंबरपर्यंत ४ ऐवजी २ जनरल डब्यांची धावणार आहे.
१६३१२/१६३११ क्रमांकाची कोच्चुवेली श्रीगंगानगर एक्स्प्रेस २४ डिसेंबरपर्यंत ४ ऐवजी ३ जनरल डब्यांची धावेल.
२२६३४/२२६३३ क्रमांकाची तिरुअनंतपूरम-निजामुद्दीन एक्स्प्रेस २७ डिसेंबरपर्यंत ४ ऐवजी २ जनरल डब्यांची धावणार आहे.
ऋषिकेश कोच्युवेली – योगनगरी एक्सप्रेस २३ डिसेंबरपर्यंत ४ ऐवजी २ जनरल डब्यांची धावेल. एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्सप्रेस २७ डिसेंबरपर्यंत ४ ऐवजी २ जनरल डब्यांची धावेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 14/Dec/2024














