चिपळूण नगर परिषदेचा आज १४८ वा स्थापना दिन

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेची १६ डिसेंबर १८७६ रोजी स्थापना झाली असून, नगर परिषदेच्या गौरवशाली परंपरेला आणि अभिमानास्पद सेवेला १४८ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त दि. १६ डिसेंबर रोजी १४८वा स्थापना दिन न. प. च्या प्रांगणात साजरा करण्यात येणार आहे.

या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. दीपप्रज्वलन, मान्यवरांचे मनोगत, नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी प्रकृती परीक्षण शिबिर व चहापान आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ६ व. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात कला उत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 16-12-2024